विखेप्रणीत ‘जनसेवा’चे राजकीय भूकंपाचे संकेत

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil

शिर्डी - नगर लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या आघाडीच्या तिढ्याबाबत आज प्रवरानगर येथे पार पडलेल्या विखेप्रणीत जनसेवा मंडळाच्या बैठकीत राजकीय भूकंप घडविण्याचे सूतोवाच दिले गेले. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये जावे, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. 

प्रवरानगर येथे आज झालेल्या या बैठकीस उत्तर नगर जिल्ह्यातील जनसेवा मंडळाचे सुमारे दोन हजार कार्यकर्ते उपस्थित होते. ‘राजकीय अन्याय होत असेल, तर सरळ भाजपची वाट धरा. अन्याय करणाऱ्यांना सोडचिठ्ठी देत, १९९९ ची पुनरावृत्ती करा. विखे हाच पक्ष आहे. हे पुन्हा दाखवून द्या,’ अशी मागणी कार्यकर्त्यांनी या बैठकीत जाहीरपणे केली. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वांना सबुरीचा सल्ला दिला. पक्षाने न्याय दिला नाही, तर आपण कार्यकर्त्यांबरोबर राहू, असा सूचक इशारा द्यायला ते विसरले नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com