राधाकृष्ण विखे पाटील गुपचूप कोल्हापुरात

राधाकृष्ण विखे पाटील गुपचूप कोल्हापुरात

कोल्हापूर  - विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि मुलाच्या भाजप प्रवेशाने राज्यभर चर्चेत आलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल गुपचूप कोल्हापूर दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याविषयी गोपनीयता पाळण्यात आली होती. सुरक्षा व्यवस्था किंवा शासकीय वाहन न घेता, त्यांनी कोल्हापुरातील काही ठिकाणी भेटी दिल्या. 

दरम्यान, ‘नाबार्ड‘चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या ताराबाई पार्कातील निवासस्थानी त्यांनी भेट दिली. डॉ. थोरात यांच्या घरी ते अर्धा तास होते, त्यांच्यासोबत जेवण करून ते निघून गेले. मंगळवारी (ता. १२) श्री. विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी भाजपत प्रवेश केला आहे. स्वतः श्री. विखे-पाटील हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. डॉ. थोरात व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. यातून काँग्रेस अंतर्गत पॅचअप करण्यासाठीच त्यांनी हा दौरा केल्याचे बोलले जाते. 

श्री. विखे-पाटील सकाळी दिल्लीहून विमानाने मुंबईत व तेथून पुण्यात आले. पुण्याहून हेलिकॉप्टरने ते तुळजापूरला गेले. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास हेलिकॉप्टरने त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत कोणी नव्हते. विमानतळाबाहेर थांबलेल्या पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. अंबाबाई दर्शनासाठी ते आले असावेत, असे समजून माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंदिरात हजेरी लावली; पण कोल्हापुरात येऊन दोन तास झाले तरी मंदिराकडेही फिरकले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com