राधानगरीतून 10,256 तर , कोयनेतून 1,22,475 क्‍युसेक विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे खुले असून धरणाचे मुख्य 3 दरवाजे 2 फूटाने उचलले आहेत. त्यामधून 6000 क्‍युसेक विसर्ग असा एकूण 10256 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे. कोयना धरणामधून आज सकाळी 7 वाजता 1,22,475 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. 

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 55 फूट 1 इंच असून एकूण 111 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.22 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, पाटगांव, कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहेत. 

वारणेत सोडण्यात आलेला विसर्ग हा 30 हजार 134 आहे. राधानगरी, तुळशी, कुंभी, कासारी यातून पंचगंगा नदीमध्ये साधारण एकवीस हजार चारशे इतका विसर्ग होत आहे. दूधगंगेचा विसर्ग 21 हजार आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कोल्हापूर दौऱ्यावर येत असून कोल्हापूर जिल्ह्यातील पूर स्थिती पूर्णपणे मंत्रालयातून नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी  त्यांनी प्रशासनाकडून आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून याबाबतचे नियोजन सुरू झाले आहे. पूर परिस्थिती 1989 आणि 2005 पेक्षा भयंकर असल्यामुळे कोल्हापुरातील पूर स्थिती बाबत थेट राज्य सरकारने मंत्रालयातून सर्व सूत्रे हलवण्याचे काम सुरू केले आहे.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhanagari discharge 10256, Koyana 122475 Discharge of water