दुसऱ्या दिवशीही मूर्तीच्या कमरेपर्यंतच किरणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव सोहळ्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही मावळतीची सूर्यकिरणे मूर्तीच्या कमरेपर्यंतच पोचली. यानिमित्ताने अजूनही किरणोत्सव मार्गात अडथळ्यांची शर्यत कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. दरम्यान, कालच्या तुलनेत आजच्या किरणांची तीव्रता कमी राहिली आणि ती कालच्या तुलनेत अधिक प्रमाणात मूर्तीच्या डावीकडे वळली. उद्या (ता. 3) किरणोत्सवाचा शेवटचा दिवस असून, अडथळ्यांमुळे किरणे पुन्हा कमरेपर्यंतच पोचतील आणि किरणोत्सव अपूर्ण राहण्याची शक्‍यता असल्याचे किरणोत्सव मार्ग निश्‍चिती समितीने सांगितले.

काल किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोचून डावीकडे लुप्त झाली होती. आज सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत किरणांनी गरूड मंडपात प्रवेश केला. त्यानंतर दोन मिनिटांनी पितळी उंबरा आणि सहा वाजून सोळा मिनिटांनी किरणांनी चरणस्पर्श केला. त्यानंतर दोन मिनिटे किरणे चरणापासून कमरेपर्यंत स्थिरावली आणि सहा वाजून अठरा मिनिटांनी ती डावीकडे लुप्त झाली. समितीने आज विशिष्ट ठिकाणाहून किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची छायाचित्रेही घेतली. त्यात काही इमारती आडव्या येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वेळी देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, समितीचे उदय गायकवाड, प्रा. डॉ. किशोर हिरासकर आदी उपस्थित होते.

Web Title: radiation in mahalaxmi temple

टॅग्स