राहुल गांधी देशातून कुठुनही निवडून येतील : सुशीलकुमार शिंदे

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 22 जानेवारी 2019

सोलापूर : काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी देशातील कोणत्याही मतदारसंघातून निवडून येतील, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. इव्हीएम हॅकींगमधील गैरप्रकार हा तपासणीनंतर स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. 

सोलापूर : काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी देशातील कोणत्याही मतदारसंघातून निवडून येतील, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. इव्हीएम हॅकींगमधील गैरप्रकार हा तपासणीनंतर स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. 

शिंदे म्हणाले, काँग्रेससाठी ही चांगली बाब आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी याही निरनिराळ्या ठिकाणी उभे राहून निवडून येत होत्या. राजीव गांधी हे
सुद्धा निवडून यायचे. राहुल गांधी यांनी इच्छा व्यक्त केली असेल किंवा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला असेल. आम्हीही त्यांना विनंती करू की त्यांनी तिथूनच उभे रहावे.

ईव्हीएम हॅकींगच्या विषयाची तपासणी सुरु आहे. हा प्रकार ज्यांनी केला, त्यांनी हा प्रकार कसा झाला हे स्पष्ट केले आहे. या प्रकाराची आम्ही चौकशी करीत आहोत.

तपासणीनंतर ईव्हीएममधील गैरप्रकार स्पष्ट होईल. आम्ही यापूर्वीही मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी केली होती, आताही तीच मागणी आहे. लोकसभा निवडणुकीला आता तीन महिने राहिले आहेत. सरकारने याबाबत
कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही मतपत्रिकेद्वारे मतदान होण्याची शक्यता कमी आहे, असेही शिंदे म्हणाले.

गत निवडणुकीत सोलापुरातील काँग्रेसचा पराभव मान्य आहे, पण भाजपच्या विजयी उमेदवाराला मिळालेले मताधिक्य मतदारांना अपेक्षित नाही. सोलापुरातही ईव्हीएम गैरप्रकार झाला असेल का, असे विचारले असता शिंदे म्हणाले, हा प्रकार देशभरातच झाल्याचा अंदाज आहे. त्यात कदाचित सोलापूरही असेल, मात्र तपासणीनंतर ते स्पष्ट होईल. तथापि, पराभव हा पराभव असतो आणि तो मी मान्य केला आहे
 

Web Title: Rahul Gandhi will win election from anywhere from country says Sushilkumar Shinde