सांगलीत बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

बनावट नोटा प्रकरणातील म्होरक्‍या मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून, तो अद्यापही पसार आहे. पोलिसांचा छापा पडल्यानंतरच तो पसार झाला. त्याचा शोध सुरू असून, मोठी माहिती समोर येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शहर पोलिसांचे पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांनाही या माहितीपासून दूर ठेवण्यात आले होते.

सांगली : येथील शामरावनगरमधील अलिशान बंगल्यातील बनावट नोटांच्या कारखान्यात आज रात्री उशीरा छापा पडला. कोल्हापूरमधील गांधीनगर ठाण्याच्या पोलिसांनी हा छापा टाकला असून, तेथून एकास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. छाप्यासंदर्भात कमालीची गोपनीयता पोलिसांनी ठेवली असून, स्थानिक पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली नाही. 

अधिक माहिती अशी, की सांगली परिसरात मिरज ग्रामीणपासून बनावट नोटांचे सत्र सुरू आहे. यापूर्वी कराडमधील टोळी, इस्लामपूरमधील टोळी गडाआड करण्यात आली होती. चार महिन्यांपूर्वी शहर पोलिसांनी दोन हजारच्या बनावट नोटांप्रकरणी कारवाई केली होती. त्यावेळी पश्‍चिम बंगाल कनेक्‍शन समोर आले होते. 

शामरावनगरमधील अरिहंत कॉलनीतील अलिशान बंगल्यात हा नोटांचा कारखाना चालत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांच्या सुत्रांना मिळाली होती. त्यानुसार आज सायंकाळी त्यांनी छापा टाकला. स्थानिक पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले नव्हते. पंधरा पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. बंगल्यात काही बनावट नोटा हाती लागल्या आहेत.

तसेच स्नॅनर मशीनसह अन्य साहित्यही आढळून आले आहे. दोन हजार आणि पाचशेच्या नोटा इथे बनवल्या जात असून, त्या बाजारपेठेत एजंटामार्फत खपवल्या जात होत्या. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. 
 
राजकीय पदाधिकारी?

बनावट नोटा प्रकरणातील म्होरक्‍या मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून, तो अद्यापही पसार आहे. पोलिसांचा छापा पडल्यानंतरच तो पसार झाला. त्याचा शोध सुरू असून, मोठी माहिती समोर येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शहर पोलिसांचे पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांनाही या माहितीपासून दूर ठेवण्यात आले होते.

Web Title: Raid on Fake Currency Factory in Sangli