इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा ; 14 जणांना अटक 

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा ; 14 जणांना अटक 

इचलकरंजी - येथील षटकोन चौक परिसरात तीन पानी जुगार अडड्यावर छापा टाकून शिवाजीनगर पोलिसांनी 14 जणांना अटक केली. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. कारवाईत 11 मोबाईल, 27 हजारांची रोकडसह सुमारे एक लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे अशी, तुषार भंडारे (वय 42), राहूल सावेकर (33), विनायक ढोकरे (28), मदन गंगधर (22), सुनिल चोनाले (30), राहूल माने (25), जितेंद्र खंडेलवाल (45), राजू पाटील (30), सलिम मुजावर (38), कादीर कवठेकर (35), विनायक बंडगर (28), प्रशांत गायकवाड (26), राजू जमदाडे (35), अयिल गोसरवाडे (38). पोलीस निरिक्षक आय.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक बी.एस. मुळीक यांच्या नेतृत्वाखालील पथकांने ही कारवाई केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com