श्रीगोंद्यात ढवळगावच्या जूगार अड्यावर छापा

संजय आ. काटे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

श्रीगोंदे (नगर) - बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपर पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत ढवळगाव येथील चौदा जुगारी रंगेहाथ पकडले. छाप्यात एक लाख ८९ हजाराच्या रोकडसह तीन मोटारी व तीन मोटारसायकलींसह साडेपंधरा लाखाचा ऐवज हस्तगत केला.

श्रीगोंदे (नगर) - बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपर पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत ढवळगाव येथील चौदा जुगारी रंगेहाथ पकडले. छाप्यात एक लाख ८९ हजाराच्या रोकडसह तीन मोटारी व तीन मोटारसायकलींसह साडेपंधरा लाखाचा ऐवज हस्तगत केला.

काल बुधवारी रात्री दहा वाजता ढवळगाव येथील शिवकृपा हॉटेलच्या पाठीमागे सुरु असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. येथे संतोष राघू शिंदे (वय ४०) रा. राजापुर ता. श्रीगोंदे, गणेश रत्नाकर मचाले (वय २५) रा. शिरुर, संजय शंकर भंडारी (वय ३४) रा. शिरुर, संजय तुकाराम पाडळे (वय ३५) रा. खरातवाडी ता. श्रीगोंदे, शिवाजी दत्तात्रेय दिवेकर (वय ३४) रा. शिरुर, अशोक जंयत जगताप (वय ४१) रा. राजापुर ता. श्रीगोंदे, कैलास ज्ञानदेव ढवळे (वय ४८) रा. ढवळगाव ता. श्रीगोंदे, दीपक सदाशिव धोत्रे (वय ५२) रा. श्रीगोंदे, शुनील नारायण खामकर (वय ३४) रा. श्रीगोंदे, राहूल अनिल आढाव (वय २८) रा. ढवळगाव ता. श्रीगोंदे, सतीश अशोक बोबडे (वय ३२) रा. पिंप्रीकोलंदर ता. श्रीगोंदे, केशव ज्ञानदेव पळसकर (वय ४०) रा. पळवे ता. पारनेर, रामदास भिवाजी पवळे (वय २८) ढवळगाव ता. श्रीगोंदे, रामदास दत्तात्रेय वाळके ( ४६) रा, कोंडेगव्हाण ता. श्रीगोंदे यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून तीन मोटारी व तीन मोटारसायकली व एक लाख ८९ हजार ३९० रुपयांची रोकड असा १५ लाख ५९ हजार ३९० रुपयांचा ऐवज हस्तगत केला.बेलवंडी पोलिसांच्या हद्दीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही आठवड्यातील दुसरा छापा असल्याने आता बेलवंडी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर शंका घेतली जात आहे.

Web Title: raid on Gambling place in shreegonda

टॅग्स