सांगली, मिरजेत कुंटणखान्यावर छापा; 10 महिलांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

सांगली / मिरज - सांगली शहरातील गोकुळनगरमध्ये सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून बांगलादेश आणि पश्‍चिम बंगालमधील दोन युवतींची सुटका केली. तर मिरज शहरातील उत्तमनगर परिसरातील वेश्‍या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. 

यामध्ये दहा महिलांची सुटका केली. तर कुंटणखाना चालवणाऱ्या ज्योती संतोष कट्टीमणी (वय २७, रा. गोकुळनगर, टिंबर एरिया, सांगली) या महिलेस अटक केली आहे. याबाबत अब्राहम शशिकांत हेगडे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सांगली व मिरज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

गोकुळनगरमधील चौथ्या गल्लीत ज्योती कट्टीमणी कुंटणखाना चालवत असल्याची माहिती मिळाली. ही महिला बांगलादेशी आणि पश्‍चिम बंगालमधील युवतींकडून हा कुंटणखाना चालवत होती. काल रात्री (ता.४) नऊच्या सुमारास पोलिसांनी या कुंटणखान्यावर छापा टाकला. त्यावेळी  तेथे बांगलादेशातील ढाका येथील युवती आणि दुसरी पश्‍चिम बंगालमधील युवती सापडल्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली. 

मुलींची सुधारगृहात रवानगी
मिरजेत पोलिसांनी बोगस ग्राहक पाठविले. या वेळी आठ महिलांना ताब्यात घेतले. महात्मा गांधी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सलाऊद्दीन लष्करी, संगीता गोसावी ऊर्फ कांबळे, किरण कांबळे, अशी त्यांची नावे आहेत. यापैकी अमिन लष्करीस अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या आठ मुलींची सुधारगृहात रवानगी केली.

Web Title: raid on prostitution business 10 women arrested crime