सांगलीतील व्हिडिओ गेम जुगार अड्ड्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

सांगली - शास्त्री चौकातील प्रीतम लॉजच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या ओम साई या व्हिडिओ गेम सेंटरवर विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. यामध्ये एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सेंटरचा मालक सचिन राजाराम चौगुले (वय ३८, रा. कोल्हापूर रोड, कबाडे हॉस्पिटलच्या मागे) आणि मॅनेजर युवराज नारायण यादव (वय २८, रा. गावभाग) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

ओम साई व्हिडिओ गेम सेंटर येथे जुगार खेळला जात असल्याची माहिती विशेष पोलिस पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली. त्यांनी आज दुपारी शास्त्री चौकातील प्रीतम लॉजच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या या सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी तेथे सेंटरचा मालक सचिन चौगुले आणि मॅनेजर युवराज  यादव होते. त्यांना अटक करण्यात आली. तर एक लाख रुपयांच्या दहा व्हिडिओ गेम मशिनसह इतर साहित्य आणि रोख सात हजार रुपये असा एक लाख १७ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या  व्हिडिओ गेम सेंटरला खेळण्याचा मनोरंजनाचा परवाना आहे. मात्र परवाना नूतनीकरण केलेला नाही. तसेच गेमच्या नावाखाली या ठिकाणी जुगार खेळला जात होता. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

सहायक निरीक्षक संतोष डोके यांच्यासह मारुती मोरे, बजरंग शिरतोडे, दीपक ठोंबरे, अरुण पाटील, सचिन जाधव, मुदस्सर पाथरवट, राजेश पाटील, हृषीकेश सदामते, गौतम कांबळे, सुहील कार्तीयानी, वनिता चव्हाण, प्रियांका धुमाळ, ज्योती चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Raid on Sangli video game gambling stand