चंदगड तालुक्‍यात मद्याच्या गोदामावर छापा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

  • हेरे (ता. चदंगड) येथील मद्याच्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापा. 
  • गोवा बनावटीच्या मद्याचे 58 बॉक्‍स असा सव्वा तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
  • संशयित राजेंद्र गवस याचा विभागाकडून शोध सुरू

 

कोल्हापूर - हेरे (ता. चदंगड) येथील मद्याच्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज सकाळी छापा टाकला. यात गोवा बनावटीच्या मद्याचे 58 बॉक्‍स असा सव्वा तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. संशयित राजेंद्र गवस याचा विभागाकडून शोध सुरू आहे. 

याबाबत विभागाने दिलेली माहिती, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैधरित्या मद्याची वाहतूक साठा करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने करडी नजर ठेवली आहे. अधीक्षक गणेश पाटील यांना हेरे चंदगड या गावामध्ये राजेंद्र गवसने विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर मद्याचा साठा करून ठेवा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने माहिती काढण्यास सुरवात केली. चंदगड - तिल्लारी रस्त्यावर असणाऱ्या राजेंद्र गवस राहत्या घरात मद्याचा साठा लपवून ठेवल्याची खात्री पथकाला झाली. त्यानंतर आज सकाळी पथकाने गवसच्या घरात छापा टाकला. घराशेजारील अडगळीच्या खोलीत एका प्लॅस्टिक ताडपत्रीच्या खाली त्याने गोवा बनावटीच्या मद्याचा साठा केल्याचे दिसून आले. पथकाने या घरातून एकूण 56 मद्याचे बॉक्‍स जप्त केले.

बाजारभावानुसार 3 लाख 26 हजार 640 रूपये इतकी त्याची किमंत आहे. गवसचा शोध सुरू असून यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याची माहितीही विभागाकडून घेतली जात आहे. ही कारवाई गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन कळेल, जय शिनगारे यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raid on wine go-down in Chandgad Taluka