रायगावचा तलाव ४० वर्षांनंतर भरला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

सायगाव - तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडातून रायगाव (ता.जावळी) येथील गाळ काढलेला तलाव सुमारे ४० वर्षांनंतर प्रथमच ओसंडून भरून वाहू लागल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परिसरात आनेवाडी, रायगाव, महामुलकरवाडी, खर्शी, सायगाव अशी गावे आहेत. गेल्या काही वर्षांपासून येथील ओढेनाले पूर्णपणे कोरडे पडले होते.

ओढ्यांना पाणी फक्त पावसातच दिसायचे. मात्र, आता तनिष्कांच्या पुढाकारातून सकाळ रिलीफ फंडातून मदत घेऊन तलावातील गाळ काढला. परिसरातील बंधाऱ्यांचाही गाळ काढला. हा तलाव भरल्याने ज्येष्ठ ग्रामस्थांनी अनेक वर्षांपूर्वी अशा प्रकारे हा तलाव भरत होता, अशी आठवण सांगितली.

तलाव भरल्याने आता पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परिसरातील गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

८० वर्षांचे रामचंद्र गायकवाड़ तलावाचे पाणी पाहून भारावले. परिसरात अनेक विकासकामे झालेली आम्ही पाहिली. मात्र, ‘सकाळ’च्या माध्यमातून रणरागिणींनी केलेले काम खरोखर कौतुकास्पद आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

 सकाळ रिलीफ फंडामुळे यंदा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. त्यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवण आता थांबणार आहे.’’
- अनिता गायकवाड, तनिष्का गटप्रमुख

Web Title: raigav lake water tanishka sakal relief fund