कोल्हापूर : विक्रमनगर, रुईकर कॉलनीचा कशामुळे वाढला संपर्क ?

अर्चना बनगे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर मिरज रेल्वेमार्गावर शहरातील विक्रमनगर, टेंबलाईवाडी हा परिसर आहे. या परिसरातून रुईकर कॉलनीला जायचे झाल्यास तब्बल तीन ते चार किलोमीटर फिरून जावे लागत होते. किंवा धोकादायक असा रेल्वे ट्रॅक ओलांडून जावे लागत होते. 

कोल्हापूर - विक्रमनगर ते रुईकर कॉलनीला जोडण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग पादचारी पुल उभारण्यात आला आहे. या पुलाची मागणी बऱ्याच वर्षापासून केली जात होती. हा पुल झाल्याने आता लोकांची प्रतिक्षा संपली आहे.  विक्रमनगर ते रुईकर कॉलनी, मार्केट यार्डला यामुळे चांगली "कनेक्‍टीव्हीटी' तयार झाली. याचा फायदा व्यापारी, नागरिक, कर्मचारी, हमाल यांना दररोज होत आहे. 

कोल्हापूर मिरज रेल्वेमार्गावर शहरातील विक्रमनगर, टेंबलाईवाडी हा परिसर आहे. या परिसरातून रुईकर कॉलनीला जायचे झाल्यास तब्बल तीन ते चार किलोमीटर फिरून जावे लागत होते. किंवा धोकादायक असा रेल्वे ट्रॅक ओलांडून जावे लागत होते. रेल्वे रुळावरुन ये-जा करत असताना बऱ्याच वेळा रेल्वे येण्याची वेळ झाल्याच्या कारणावरून नागरिक अत्यंत घाईगडबडीने हा रेल्वे रूळ पार करीत असत. त्यामुळे अनेक वेळा अपघातही झाले आहेत. अनेक कर्मचारी, व्यापारी, लघुउद्योजक यांना धोकादायकरीत्या रेल्वे क्रॉसिंग करावे लागत होते. तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यंनाही धोकादायकरीत्या रेल्वे रूळ पार करुन जावे लागत होते. 

आता या मार्गावर रेल्वे रूळ पार करण्यासाठी पादचारी पूल बांधला आहे. पंचवीस ते तीस वर्षाची असलेली ही प्रतीक्षा पूर्ण झाली. यामुळे परिसरातील नागरिकांना हा पादचारी मार्ग दिलासा देणारा ठरला आहे. विक्रम नगर विभागमध्ये कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे विक्रम नगर आणि रुईकर कॉलनी यांचा जवळचा संबंध आहे. विक्रम नगर येथून शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मार्केटयार्ड ला जाणार रस्ता हा देखील महत्त्वाचा आहे. टेंबलाई टेकडी चे देवीचे दर्शन घेण्यासाठी हा मध्यममार्ग अनेकांना पूर्वी सोईस्कर पडत होता.मंदीराला,शाळेला जाण्यासाठी अनेकांना चार ते पाच किलोमीटर अंतर पार करून जावे लागत होते. विक्रम नगर या भागात महिला कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

रात्री-अपरात्री पूर्वी रेल्वेचा हॉर्न वाजायचा नाही. त्यातच अंधार असल्यामुळे जीव मुठीत घेऊन रेल्वे क्रॉसिंग करावे लागत होते; मात्र आता पूल झाल्यामुळे तिन्ही ऋतूत पुलावर जाता येते. त्यामुळे भीती कमी झाली; शिवाय अपघात प्रमाण कमी झाले आहे. 

लहान गाड्यांसाठीही रस्ता हवा 

"पुलाची प्रतीक्षा संपली आहे. पूल झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण टळले आहे; मात्र मार्केटला जाण्यासाठी पादचारी पुलाबरोबर लहान गाड्यांचा रस्ता झाला तर मार्केटला जाण्यास सोईस्कर होईल.'' 
- पांडुरंग मोहिते,
नागरीक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Crossing Bridge Connects VikaramNagar Raikar Colony