नुकसान झालेले शेतकरी पंचनाम्याविना बसले ताटकळत

हुकूम मुलाणी
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकय्राचे पंचनामे कृषी, महसूल, पंचायत समिती मधील रिक्त पदांमुळे उरकत नाहीत. अधिकारी शेतात पंचनाम्याला येतील म्हणून शेतकरी माहिती देण्यासाठी ताटकळून जात आहेत. परगाव ला गेलेले शेतकरी यातून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने सरसकट मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

मंगळवेढा - परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकय्राचे पंचनामे कृषी, महसूल, पंचायत समिती मधील रिक्त पदांमुळे उरकत नाहीत. अधिकारी शेतात पंचनाम्याला येतील म्हणून शेतकरी माहिती देण्यासाठी ताटकळून जात आहेत. परगाव ला गेलेले शेतकरी यातून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने सरसकट मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

तालुक्यात अल्पभूधारक व असलेले 66 हजार पेक्षा अधिक शेतकरी असल्यामुळे कमी काळात या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत करण्याचे शक्य होत नाही. तालुक्यात खरीप हंगामात अल्पशा पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पूर्णपणे जळून गेले. ज्या शेतकऱ्याकडे विहिरीला, बोअरला पाणी आहे. त्या शेतकऱ्यांची पिके परतीच्या पावसाने झोडपून टाकली तर ऑक्टोबरच्या पूर्वार्धात पेरणी झालेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सूर्यफूल, कांदा, मका, डाळिंब, द्राक्षे, मिरची या पिकांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत शासनाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले, परंतु शासकीय कार्यालयातील रिक्त पदे व कर्मचाऱ्यांना योग्य समन्वयाचा अभावामुळे प्रत्येक गावात प्रतिदिन 30 ते 40 शेतकऱ्याचे पंचनामे होत असल्यामुळे आपल्या शेतात अधिकारी येथील म्हणून बहुतांश शेतकरी दिवसभर वाट पाहत बसल्याने मशागतीची अन्य कामे व दिवसाचा रोजगार बुडत आहे. तर परगावी असलेले शेतकरी या पंचनाम्यापासून वंचित राहणार आहेत. तर काही गावात डाळिंबी चा पिकाच्या नुकसानीचे तलाठी, कृषी सहाय्यक, पंचनामे करत नसल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून सुरू झाल्या.

ज्या शेतकऱ्यांचे पंचनामा झाले नाहीत. त्या शेतकऱ्यांनी व पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी मिळण्यासाठी पंचनामा फॉर्म, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स ,विमा भरला असेल तर पावती झेरॉक्स, अँड्रॉइड मोबाईल वरून नोट कॅम हे अप्लीकेशन प्ले स्टोअरमधून करून नुकसानीचा फोटो आदी कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना ग्रामीण भागातील नोटीस फलकावर लावण्यात असल्याने मदत निधीसाठी अँड्रॉइड मोबाईलधारक शोधण्याची वेळ आली. त्यामुळे  मदत निधीचा लाभ म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर म्हणण्याची वेळ शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची बँक खाते  क्र. तलाठ्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट गतवर्षी खरिपाचा दुष्काळ निधीप्रमाणे बँक खात्यात जमा करण्याची मागणी होत आहे.

नुकसान झालेल्या ज्वारी व मक्याचे पंचनामे करण्यात आले परंतु डाळिंब पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे सांगत डाळिंब पिकाला  वगळले.फळपीकाचे नुकसान देखील जास्त आहे.
- रत्‍नाबाई थोरबोलेे शेतकरी शिरनांदगी.

शेतीत उत्पादन साठी केलेला खर्च व निघणारे उत्पन्न दुष्काळ,पाऊस यामुळे खरिपा बरोबर रब्बीचे पीक धोक्यात आले पुन्हा पंचनामे व पाहणीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना त्रास देण्यापेक्षा दुष्काळ निधी प्रमाणे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या चा निधी शेतकऱ्यांचा तळणी बँक खात्यात जमा करावा.
- राजकुमार स्वामी. तालुकाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Agriculture loss farmer information officer ignore