साताऱ्यात पावसाची उघडीप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पाटण (सातारा) - पावसाची संततधार व काहीकाळ उघडीप असा सुरू असलेला पाऊस थांबला आहे. चोवीस तासात कोयनानगरला चार, नवजाला सहा व महाबळेश्र्वरला फक्त एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोयना जलाशयाचा पाणीसाठा ३०.६७ टीएमसी आहे. आवक प्रतिसेकंद आठ हजार २५७ क्युसेक्स होत आहे.

२५ व २६ जुन रोजी पडलेल्या मुसळधार पावसाचा अपवाद सोडला तर गेली चार दिवस कधी संततधार तर कधी पुर्ण उघडीप असा पावसाचा सिलसिला चालु आहे. पावसाने उघडीप दिल्याने मात्र शेतकरी आंतर मशागतीच्या कामात व्यस्त असलेला पहावयास मिळत आहे. कोयना जलाशयाची पाणीपातळी २०७७.९ फुट व एकुण पाणीसाठा ३०.६७ टीएमसी झाला आहे. गेल्या २४ तासात कोयनानगरला ४ (९८८), नवजाला ६ (८९७) व महाबळेश्र्वरला फक्त १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद आठ हजार २५७ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

Web Title: rain forecast in Satara