कलेढोणला टॅंकर सुरूच राहणार 

कलेढोणला टॅंकर सुरूच राहणार 

कलेढोण : कलेढोण व विखळे परिसरात चार वर्षांनंतर मोठ्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर ढगफुटीच्या चर्चेला उधाण आल्याने प्रशासनाकडून खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी परिसराची पाहणी केली. त्या वेळी ग्रामस्थांना टॅंकरने होणारा पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कलेढोणला चार दिवसांपूर्वी मोठ्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरात ढगफुटीची झाल्याची चर्चा झाली. मात्र वास्तवात चार वर्षांनंतर गावात मोठ्या पावसाने हजेरी लावली होती. त्यात कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही. ढगफुटीत एखादा प्रदेश काही मिनिटांत नष्ट करण्याची क्षमता असते. गारांचा व विजांचा समावेश असतो. त्यात तासाभरात सरासरी शंभर मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, कालच्या पावसात अशा कोणत्याच घटना घडल्या नाहीत, तरीही ढगफुटीची चर्चा झाल्याने प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी कलेढोणला भेट दिली. त्या वेळी त्या म्हणाल्या, ""कलेढोणला पडलेला पाऊस म्हणजे अतिवृष्टी होय. या पावसामुळे कोणताही भाग वाहून गेला नाही. सर्व भागांची पाहणी करता हा चांगला पाऊस झाला. त्यात गारपीठीचा समावेश नाही. केवळ मातीचे नवीन बंधारे वाहून गेले. या भागाची भूजल पातळी वाढविण्यासाठी अद्याप मोठ्या पावसाची गरज आहे, तसेच गावास टॅंकरने होणारा पाणीपुरवठा बंद होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. या वेळी तलाठी शिंदे, राम चव्हाण, राजू लिगाडे, अप्पा महामुनी, अलताफ तांबोळी, बाळू शिकलगार, निखिल बुधावले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com