सांगलीत टिळक चौक पाण्यात, आयर्विन पूल वाहतुकीस बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून नदीकाठी महापुराचे संकट आणखी गंभीर झाले आहे आज सकाळी सात वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी साडे 49 फुटांहून अधिक होती नदीचे पाणी शहरातील टिळक चौक मारूती चौक कोल्हापूर रोड येथे आले होते इस्लामपूर कडे जाणारा आयर्विन पूल सकाळपासून बंद करण्यात आला आहे त्यामुळे सांगली शहरातून बाहेर पडणारे जवळपास सर्व मार्ग बंद होत आले आहेत.

सांगली - सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून नदीकाठी महापुराचे संकट आणखी गंभीर झाले आहे आज सकाळी सात वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी साडे 49 फुटांहून अधिक होती नदीचे पाणी शहरातील टिळक चौक मारूती चौक कोल्हापूर रोड येथे आले होते इस्लामपूर कडे जाणारा आयर्विन पूल सकाळपासून बंद करण्यात आला आहे त्यामुळे सांगली शहरातून बाहेर पडणारे जवळपास सर्व मार्ग बंद होत आले आहेत.

कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून दोन्ही धरणातून पाण्याचे विसर्गही वाढण्यात आले आहेत कोयना धरणातून आज सकाळपासून एक लाख सात हजार 432 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच शहर आणि परिसरात रात्रभर पावसाचा जोर सुरू आहे.

महापालिका क्षेत्रात आता टिंबर एरिया स्टेशन चौक तसेच शहरात काही भागात पाणी येण्याची शक्यता आहे. महापूर आणखी गंभीर होत असल्याने प्रशासन सर्व स्तरावर मदतीसाठी सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. काल रात्रीपासून आणखी शेकडो कुटुंबांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. स्थलांतरित पूरग्रस्तांची सोय करण्यासाठी प्रशासनातर्फे शाळा मंगल कार्यालय ताब्यात घेण्यात येत आहेत. त्या ठिकाणी पूरग्रस्तांची निवासाची, भोजनाची सोय करण्यात येणार आहे. विविध सामाजिक संस्थांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. शहरात विविध शाळा महाविद्यालय कार्यालये यामधून सुमारे तीन ते साडेतीन हजार नागरिकांची निवासाची सोय केली आहे.

आमदार सुधीर गाडगीळ, मंत्री सुरेश खाडे महापौर संगीता खोत आयुक्त नितीन कापडणीस हे पूरस्थितीवर लक्षण असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे याचे नियोजन करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Krishna River Flood Water Tilak Chowk Irwin Bridge Transport Close