महाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

महाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत आहे. 

महाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत आहे. 

महाबळेश्‍वर परिसरात दरवर्षीच मुसळधार पाऊस कोसळतो, तरीही यंदा सातत्याने पाऊस कोसळत आहे. एक जूनपासून ते कालपर्यंत (ता. 20) महाबळेश्‍वर परिसरात 5090.7 मिलिमीटर (200 इंच ) पावसाची नोंद येथील हवामान खात्यात नोंद झाली आहे. दिवस व रात्र कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने व सोसाट्याच्या वाऱ्याने अक्षरशः महाबळेश्‍वरला झोडपून काढले आहे. येथील जनजीवन पूर्णतः कोलमडले असून गारठ्याच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे. पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. दुकाने उशिरा उघडली जात आहेत. सुटी वगळता पर्यटकांची संख्याही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. 

Web Title: Rain in Mahabaleshwar