मोहोळ तालुक्यात वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू

राजकुमार शहा 
रविवार, 8 एप्रिल 2018

शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे हवेत उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारे सुरू झाले. तर विजेचा कडकडाटही सुरू झाला. या वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच चालु वर्षी आंब्याचे पिक कमी आहे.

मोहोळ : शनिवारी सायंकाळी मोहोळ तालुक्यात झालेल्या वादळी वारे व विजेच्या कडकडाटामुळे वडवळ व सोहाळे या दोन गावात वीज पडुन दोन जनावरे मृत्युमुखी पडली. तर पापरी (ता. मोहोळ) येथील नवनाथ शेळके यांच्या वस्ती समोरील नारळाच्या झाडावरही वीज पडली.

शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे हवेत उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारे सुरू झाले. तर विजेचा कडकडाटही सुरू झाला. या वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच चालु वर्षी आंब्याचे पिक कमी आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडाचे आंबे मोठ्या प्रमाणात पडले आहे.

याच वादळी वाऱ्यात जोराची वीज कडकडल्याने वडवळ ता मोहोळ येथील बजरंग शंकर मळगे यांच्या शेतातील वस्ती समोरील चिंचेच्या झाडाखाली बांधलेली गाभण गायीच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. तर सोहाळे ता मोहोळ येथील तानाजी शिवाजी जगताप यांच्या म्हशीच्या अंगावर वीज पडल्याने तिचाही जागीच मृत्यु झाला. दोघा शेतकऱ्यांचे मिळुन दीड लाखांचे नुकसान झाले आहे. पापरी येथील नवनाथ शेळके यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाड जळाले, मात्र जिवीतहानी झाली नाही. 

Web Title: rain in Mohol solapur

टॅग्स