नगर जिल्ह्यातील ११ महसूल मंडळात पावसाची हजेरी

नगर जिल्ह्यातील ११ महसूल मंडळात पावसाची हजेरी

नगर - जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने शनिवारी (ता. २२) हजेरी लावली, मात्र अजूनही सर्वच भागांत चांगल्या पावसाने सुरवात केलेली नाही. प्रशासनाच्या आकडेवाडीनुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत (रविवार) दहा टक्के कमी पाऊस झाला आहे. शनिवारी रात्री कोपरगाव, नेवासा, कर्जत, राहुरी, शेवगाव, नगरसह सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. अकरा महसूल मंडळात चांगला पाऊस झाला. कोपरगाव मंडळात सर्वाधिक १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या अकोले तालुक्यात अजूनही पुरेसा पाऊस सुरू झालेला नाही. 

दुष्काळाने गेली वर्षभर होरपळ होत असलेल्या नगर जिल्ह्याला चांगला पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत दहा टक्के पाऊस कमी आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत २१.९० टक्के पाऊस झाला होता तर यंदा आतापर्यंत १२.६४ टक्के पाऊस झाला आहे. यंदा आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक ३८.३९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक कमी २.८८ टक्के पाऊस संगमनेर मध्ये झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव, रवंदे, टाकळी या गावांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले. जोरदार पावसामुळे शेतातून वाहून आलेल्या पाण्याने ब्राह्मणगाव शिवारात संतोष ठक्कर या कांदा व्यापाऱ्याचा दहा ते बारा ट्रॅक्टर म्हणजे २० ते २२ टन कांदा वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्व ९७ महसूल मंडळात शनिवारी पावसाने हजेरी लावली असली तरी अकरा महसूल मंडळातच चांगला पाऊस झाला.

रविवारी सकाळपर्यंत झालेला पाऊस (मिमी) - श्रीगोंदा - ४७, कोळगाव - ५२, राहुरी - ४७, पुणतांबा - ६५, नेवासा खुर्द - ७०, नेवासा बुद्रुक - ७२, सलाबतपूर - ७०, कोपरगाव - १३०, पोहेगाव - ४५, सुरेगाव - ६५, रंवदे - ५२.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com