साताऱ्यात तुरळक पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

सातारा - जिल्ह्यात अनके ठिकाणी तुरळक पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर, जावली, पाटण या तीन तालुक्‍यांत काही प्रमाणात पावसाचा जोर वाढला आहे. सातारा, कऱ्हाड, फलटण, खंडाळा व वाई तालुक्‍यांत तुरळक पाऊस झाला आहे. माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यातून पावसाने दडी मारली आहे.

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढू लागला असून, गेल्या 24 तासांत 0.026 टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली असून, धरणात 7.16 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. महाबळेश्वर, जावली, पाटण या तीन तालुक्‍यांत पावासाचे प्रमाण वाढू लागले आहे. हा भाताच्या नर्सरीना तसेच धूळवाफेवर करण्यात आलेल्या पेरणीस उपयुक्त ठरणार आहे. सातारा, कऱ्हाड, फलटण, खंडाळा व वाई तालुक्‍यांत तुरळक तर माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यांतून पावसाने दडी मारली आहे. महाबळेश्वर 41, पाटण 12.5, जावली 8.5, कऱ्हाड 3.9, सातारा 2.3, वाई 2.2, खंडाळा 2.1, फलटण 1.9 तर जिल्ह्यात सरासरी 6.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस सुरू होता.

Web Title: rain in satara