सोलापुरात पावसाची भुरभुर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

सोलापूर : राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस पडत असताना सोलापुरात मात्र भुरभुर पाऊस पडत आहे. आज सकाळपासून सोलापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारचा पाऊस पडत आहे. 

सोलापूर : राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस पडत असताना सोलापुरात मात्र भुरभुर पाऊस पडत आहे. आज सकाळपासून सोलापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारचा पाऊस पडत आहे. 

जिल्ह्यात पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत जेमतेम सरासरी 60 टक्के पाऊस झाला. सहा जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले आहे. त्याचे वाहन बेडूक हे आहे. त्यामुळे या नक्षत्रात शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ती पावसाकडून होत नाही. पुरेशा प्रमाणात ओल नसल्यामुळे खरिपाची पेरणी करण्याचे धाडस शेतकरी करत नाही. या नक्षत्रात जोरदार पाऊस झाला तर खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्‍यता आहे. नागपूर व मुंबई येथे झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत. नेमकी उलटी स्थिती सोलापुरात दिसून येते. पुढील काही दिवसात मोठा पाऊस पडेल अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. 

Web Title: rain in solapur