कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

चोवीस तासात कोयना धरण परिसरात 96 मिलीमीटर पाऊस झाला. कोयना धरणात आजचा पाणी साठा 39.09 टिएमसी आहे. आज अखेर कोयना धरण परिसरात 1490 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कऱ्हाड : कोयना धरणात कालपासून पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. तरिही चोवीस तासात कोयना धरणाचा पाणी साठा 1.82 टिेएमसीने वाढला.

चोवीस तासात कोयना धरण परिसरात 96 मिलीमीटर पाऊस झाला. कोयना धरणात आजचा पाणी साठा 39.09 टिएमसी आहे. आज अखेर कोयना धरण परिसरात 1490 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला आजचा पाऊस 81 मिलीमीटर तर आज अखेर 1341 मिलीमीटरचा तर महाबळेश्वरला 135 मिलीमीटरचा तर आज अखेर 1209 मिली मीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणात सुमारे 24 हजार 109 क्युसेक पाण्याची आवक होते आहे.

Web Title: rainfall in Koyna dam area