कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप

राधानगरी धरण 81 टक्के भरले : पंचगंगेची पाणी पातळी 42 फुटांवर
कोल्हापूर - राधानगरी, गगनबावडा तालुक्‍यांतील तुरळक पाऊस वगळता दुसऱ्या दिवशीही आज पावसाने उघडीप दिली; पण नदी पात्रातील पाणी संथगतीनेच ओसरत राहिले. राधानगरी धरण आज सायंकाळी 7 पर्यंत 6.81 टीएमसी म्हणजे 81 टक्के भरले आहे. पंचगंगेची पातळी आज 42 फुटांपर्यंत आली आहे. जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार हेक्‍टर शेती तीन दिवसांपासून पाण्याखाली आहे.

जिल्ह्यात चार दिवसांच्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी केले. धरण भरण्याआधीच नद्यांना आलेला पूर शहरवासीयांसह नदीकाठच्या गावकऱ्यांच्या चिंतेचा विषय झाला होता. कालपासून पावसाने उघडीप दिली. आज सूर्यदर्शन झाले. पावसाने उघडीप दिल्याने पूर ओसरू लागला आहे. तरीही, काल 45.5 असणारी पंचगंगा नदीची पाणी पातळी आज 42 फुटांपर्यंत खाली आली; पण पूर ओसरण्याची गती कमी असल्याने नदीकाठची गावे अजूनही भीतीच्या छायेखाली आहेत. यापूर्वी, धरण भरून दरवाजे उघडल्यावर जेवढी पाणीपातळी होते, तेवढीच पाणीपातळी चार दिवसांच्या पावसाने ठेवली आहे. आज रात्रीही पावसाने उघडीप दिल्यास पूर जलद गतीने ओसरण्यास मदत होणार आहे.

नदीकाठच्या गावांचा पाणीपुरवठा बंद
पुराचे पाणी पंपिंगमध्ये शिरल्याने नदीकाठी असणाऱ्या गावांतील पिण्याचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. थेट पुराचे पाणी पिण्यासाठी घेतले जात असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये
धरण* आजचा पाणीसाठा टीएमसीमध्ये* एकूण पाणीसाठा क्षमता

राधानगरी* 6.81* 8.36
तुळशी* 1.87* 3.47
वारणा* 21.74* 34.39
दुधगंगा* 10.77* 25.39
कासारी* 2.16* 2.77
कडवी* 2.52* 2.51
कुंभी* 2.18* 2.71
पाटगाव* 1.82* 3.71
चिकोत्रा 0.38* 1.52

राधानगरी - राधानगरी धरणात साडेसहा, काळम्मावाडीत पावणे अकरा तर तुळशी धरणात दोन टीएमसी साठा झाला असून गेल्या चोवीस तासांत राधानगरी धरणक्षेत्रात 22, काळम्मावाडीत 10 तर दाजिपूर पाणलोटक्षेत्रात 35 मिलिमिटर पाऊस झाला. आज पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणलोटक्षेत्रातील ओढया-नाल्यांचे पाणी जलाशयात येत असल्याने 24 तासांत तिन्ही जलाशयाच्या पातळीत किमान अर्धा तर कमाल एक फुटाने वाढ होत आहे. आजअखेर राधानगरी धरण 80 टक्के भरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com