राईनपाडा हत्याकांड: मृतांच्या वारसांना मदतीचे धनादेश सुपूर्त

हुकूम मुलाणी
रविवार, 22 जुलै 2018

जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या लेखी पत्राप्रमाणे शासनाकडून प्राप्त निधीचे धनादेश मयताचे वारसदाराकडे देण्यात आले.
- आप्पासाहेब समींदर तहसीलदार मंगळवेढा

मंगळवेढा : सोशल मिडीयातील अफवेमुळे धुळे जिल्हयातील राईनपाडा येथे जमावाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तालुक्यातील खवे व मानेवाडी येथील मयताच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दहा लाखाचा धनादेश निवासी नायब तहसीलदार संतोष आदमुलवाड यांच्या हस्ते वारसदारांना देण्यात आले.

यामध्ये खवे येथील मयत दादाराव भोसले, भारत भोसले, भारत माळवे, पत्नी नर्मदा भोसले, संगीता भोसले, शांताबाई माळवे, मानेवाडी येथील मयत अंग्नू इंगोले यांची आई कल्पना इंगोले यांच्याकडे या मदतीचे धनादेश देण्यात आले. यावेळी मंडल अधिकारी नागनाथ वाकसे,उल्हास पोळके,तलाठी मुधकर वाघमोडे,समाधान वगरे, नाथपंथी डवरी समाजाचे मच्छिद्र भोसले, गजेंद्र भोसले, दादा भोसले, पंडीत पाटील, देवानंद बाबर, दय्राप्पा कित्तुर रेवणसिध्द पाटील लक्ष्मण भोसले आदीसह मयताचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्रानी जाहीर केलेल्या पाच लाखाच्या मदतीत नातेवाईकांच्या आंदोलनामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आमदार प्रशांत परिचारक यांना पाठपुरावा करुन वाढ केली. तरीही शासनाच्या मदत व समाजाच्या प्रश्‍नाबाबत मयताचे अंत्यविधी न करण्याचा प्रवित्रा नातेवाईकांनी खवे येथे घेतला असता जिल्हधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबत लेखी आश्‍वासन दिल्यामुळे अंतविधी उरकण्यात आला. यानंतर अनेक मान्यवरांनी सात्वन करताना शासकीय मदत लवकर मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. शिवाय आ. भारत भालके यांनीही याबाबत नागपूरच्या अधिवेशनात आवाज उठविला.

जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या लेखी पत्राप्रमाणे शासनाकडून प्राप्त निधीचे धनादेश मयताचे वारसदाराकडे देण्यात आले.
- आप्पासाहेब समींदर तहसीलदार मंगळवेढा

महाराष्ट्र शासनाने वेळेत मदत देवून कुटूंबाला आधार देण्याचे काम केले आता पाचवा मयत कर्नाटकातील असल्यामुळे त्यासाठी पण कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा करावा.
- मच्छिद्र भोसले  अध्यक्ष नाथपंथी डवरी समाज

Web Title: Rainpada mass murder case government help to families