कोयना धरणाचे दरवाजे सहा इंचाने वाढविले

Raised the Koyna dam door by six inches in the evening
Raised the Koyna dam door by six inches in the evening

कऱ्हाड - कोयना धरणाच्या पामलोट क्षेत्रात पावासाची संततधार कायम आहे. त्यामुळे सायंकाळी सहानंतर कोयनेचे दरवाजे सहा इंचानी वाढवण्यात आले आहेत.

दुपारी ते सहा पुटावर होते सायंकाळी सहा इंचानी ते वर घेण्यात आले. सध्या धरणात 103.08 टिएमसी पाणी साठा आहे. दिवसभरात झालेल्या सतंतधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. सकाळी 102.76 टिएमसी पाणी साठा होता. धरणातून सध्या 53 हजार 385 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दिवसभरात कोयना येथे 47, नवजाला 67 व महाबळेश्वरला 47 मिलीमटर पाऊस झाला आहे. आजअखेर  नवजाला सर्वाधिक पाच हजार 90 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com