अबब ...वाढले साप ः कोठे वाचा

images (1).jpg
images (1).jpg

सांगली : साप साप म्हणून भुई थोपटू नये असे म्हटले जाते. कारण साप म्हटले की भल्याभल्यांची बोबडी वळते. सध्या पावसाळा सुरु झाल्याने साप अनेकजागी दिसतात. पावसाच्या पाण्याने बिळे मुजतात. परिणामी त्यांच्या अधिवासावर होणारे हे आक्रमण त्यांना सहन न होणारे असते. त्यामुळे मानवी वस्तीच्या आसपास सर्पदंशाच्या घटना वाढलेल्या आहेत.

पावसाळा हा सापांच्या प्रजननाचा काळ असल्याने सुरक्षित जागा शोधण्यासाठी ते बाहेर पडतात. भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेले साप आपसूकच माणसाकडून मारले जातात. सांगली शहरासह अनेक उपनगरात सापांचा सुळसुळाट झाला आहे.

प्रामुख्याने सांगलीवाडी, सिध्दार्थ परिसर, धामणी परिसर, शिंदे मळा, पंचशीलनगर, कुपवाडच्या विस्तारित भागात सापांचा वावर सर्वाधिक आहे. 
नागरिकांनी साप दिसल्यास घाबरुन न जाता आपत्कालीन परिस्थितीची शास्त्रीय माहिती घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी साप निघत असल्याने घबराट निर्माण होते.

त्यासाठी डायरीत स्थानिक सर्पमित्र,प्राणीमित्र व वनविभागाचे संपर्क क्रमांक लिहून ठेवावेत. घर किंवा परिसरात साप दिसल्यास घाबरुन न जाता त्याच्या हालचालीकडे लक्ष द्यावे. वनविभाग किंवा परिसरातील प्राणीमित्र, सर्पमित्रांना याची माहिती द्यावी. त्याला पकडण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करु नये. 

साप निघाल्यास काय कराल ? 
- साप घरात आढळल्यास न घाबरता शांत रहा. सर्पमित्र किंवा वनविभागाशी तात्काळ संपर्क करावा. 
- त्याच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष द्या. 
- लहान मुले, पाळीव प्राण्यांना सापापासून दूर ठेवा. 
- सापाजवळ जाण्याचा अथवा छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करु नये. 

साप येउ नये म्हणून घ्यावयाची काळजी 
- घराजवळ पालापाचोळा, कचरा, दगड-विटांचे ढीग, लाकडे रचू नयेत. 
- घराच्या भिंतीसह कुंपणाला पडलेली भगदाड,बिळे तात्काळ बुजवून घ्यावीत. 
-घराच्या खिडक्‍या,दरवाज्याशेजारील झाडांच्या फांद्या तोडाव्यात. 
-गवतातून चालताना पायात बूट घालावेत. अंधारात बॅटरीचा वापर करावा. 
- रात्री जमिनीवर झोपू नये. रात्री वावर असणाऱ्या सापांपासून धोका उद्भवू शकतो. 
- साप भिंतीजवळून जात असल्याने जमिनीवर झोपणे अपरिहार्य असल्यास अंथरुण भिंतीलगत न टाकता खोलीच्या मध्यभागी घालावे. 
- हालचाल करणाऱ्या वस्तूकडे साप आकर्षित होतो. त्यामुळे अचानक साप समोर आल्यास हालचाल न करता जाग्यावरच स्तब्ध उभे राहावे. 
------------------ 
चार सापच विषारी 
भारतात सुमारे 52 प्रकारचे विषारी साप आहेत. त्यापैकी आपल्या परिसरात नाग, मण्यार, घोणस व फुरसे या चारच विषारी जाती आहेत. इतर साप बिनविषारी किंवा निमविषारी आहेत. त्यांच्यापासून मानवाला कोणताही धोका नसल्याचे तज्ञ सांगतात. 


-अजित काशिद, 
संस्थापक, ऍनिमल सहारा फाउंडेशन, सांगली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com