सोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच  : सरवदे

अक्षय गुंड 
शनिवार, 19 जानेवारी 2019

माढा येथे कार्यकर्त्यांच्या बैठक प्रसंगी आले असता, पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, उपनगराध्यक्ष प्रभाकर जाधव, माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर, गंगाराम पवार नगरसेवक शहाजी साठे, जितेंद्र बनसोडे, चंद्रकांत वाघमारे, मारूती वाघमारे आदि उपस्थित होते. 

माढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या पक्षाची ताकद असुन, आम्ही ठरवेल तोच खासदार होणार असा ठाम विश्वास महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ सरवदे यांनी माढा येथे पत्रकार परिषदेत केला.

माढा येथे कार्यकर्त्यांच्या बैठक प्रसंगी आले असता, पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, उपनगराध्यक्ष प्रभाकर जाधव, माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर, गंगाराम पवार नगरसेवक शहाजी साठे, जितेंद्र बनसोडे, चंद्रकांत वाघमारे, मारूती वाघमारे आदि उपस्थित होते. 

श्री सरवदे म्हणाले की, लोकसभेच्या जागा वाटपात सोलापुरसह आमच्या पक्षाला ४ जागांची मागणी केली आहे. भारिप एमआयएम चा आपल्या भागात प्रभाव नाही. त्यामुळे सोलापूर लोकसभेत कुणाला पराभूत करून कुणाला विजयी करायचे आम्ही ठरवु शकतो. पुढे त्यांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा आढावा मांडत. ६० प्रकारच्या व्यवसायासाठी एक लाखांच्या थेट कर्ज योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांचे सात ते पंचवीस जानेवारी दरम्यान कर्ज वाटप अर्ज घेणार असून जिल्हा निहाय त्यांची छानणी करुन पात्र लाभार्थ्यांना कर्ज वाटप करुन पारदर्शी कारभार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Rajabhau Sarwade statement on Solapur MP