राजापुरात हजारो हात एकवटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

बुध - राजापूर (ता. खटाव) येथे ग्रामस्थ व तनिष्का गटातर्फे महाश्रमदान शिबिरात महाविद्यालयीन युवक, युवतींनी सहभाग घेतला. शाळांना सुटी असतानाही राजापूरकरांच्या हाकेला प्रतिसाद देत उत्तर खटाव परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक सकाळी आठ वाजल्यापासून जरांबी पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात सखल समतल चर काढण्यात मग्न झाले होते.

विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारीही सुटी घेऊन श्रमदानात सहभागी होत आहेत. त्यामुळे गावातील महिला, मुले व ग्रामस्थांच्या मदतीसाठी हजारो हात एकवटल्याचे चित्र राजापूर शिवारात पाहण्यास मिळत आहे.

गेली तीन वर्षे राजापूर ग्रामस्थ श्रमदानाच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करत आहेत. पाठीशी कोणी सेलिब्रेटी नाही, कोणी पुढारी नाही. केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, तनिष्कांची साथ व ग्रामस्थांच्या एकजुटीच्या जोरावर गावाने कोट्यवधींची जलसंधारणाची कामे मार्गी लावून गाव पाणीदार बनविले आहे. जलयुक्त शिवारच्या यशानंतर आणि जिल्हास्तरीय अहल्याबाई होळकर जलमित्र पुरस्कार मिळाल्यानंतर या गावाला खऱ्या अर्थाने नवा सूर सापडला आहे. 

एकीकडे शासनाच्या मदतीने व लोकसहभागातून नवीन सिमेंट 
बंधाऱ्यांचे जाळे उभारण्याचा झपाटा राजापूरकरांनी लावला आहे. दुसरीकडे भल्या पहाटे डोंगर उतारावर सखल समतल चर काढणे, दगड गोळा  करून ओहळाच्या ठिकाणी दगडी बांध उभारण्याची कामे ग्रामस्थ एकजुटीने करीत आहेत. श्रमदानातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग राजापूरकरांना गवसला आहे.

Web Title: rajapur jarambi lake labour donation