कोल्हापूर : राजाराम कारखान्याची वार्षिक सभा गुंडाळली केवळ पाच मिनिटात

कोल्हापूर : राजाराम कारखान्याची वार्षिक सभा गुंडाळली केवळ पाच मिनिटात

कसबा बावडा - येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत केवळ पाच मिनिटात सर्व विषय मंजूर करण्यात आले.  दरम्यान विरोधकांनी सभेत गोंधळ केला असा सत्तारूढ गटाने आरोप केला तर आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याने सत्तारूढ गटाने सभा गुंडाळली असा आरोप विरोधी गटाने केला.

येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज सकाळी 11 वाजता वार्षिक सभा होती. कारखाना बचाव कृती समितीने यापूर्वी कारखाना प्रशासनाला १६ लेखी प्रश्न विचारले होते. या प्रश्नावर प्रशासन प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले होते.

कार्यकारी संचालक ए. व्ही. निकम यांनी स्वागत केले. अध्यक्ष हरीश चौगुले यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक बोलण्यासाठी उठले. त्यांनी भाषण सुरू करतात सभासदांच्या मधून लेखी प्रश्नांची उत्तरे प्रथम द्या अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नांची उत्तरे ही पोस्टाने प्रत्येकाच्या घरी पाठविली आहेत, असे सांगण्यात आले. यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. यावेळी नितीन पारखे यांनी मेगाफोन घेऊन बोलण्यास सुरुवात केली. यावर महाडिक यांनी तुला माईक कोणी दिला असा प्रश्न विचारल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. स्टेज समोर बसलेले सत्तारूढ गटाचे कार्यकर्ते सर्व विषय मंजूर मंजूर अशा प्रचंड घोषणा देऊ लागले. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधी गटाकडून घोषणा देण्यात येऊ लागल्या. यातच सर्व विषय मंजूर होऊन सभा संपली असे जाहीर करण्यात आले.  

यासभेनंतर विरोधी गटाने समांतर सभा घेतली. यावेळी कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांकडून याला मज्जाव करण्यात आला. यावर काही तरुणांची त्यांच्याशी बाचाबाची झाली सभा घेण्याचा अधिकार आम्हाला आहे तुम्ही कोण अडवणार अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.

आम्ही विचारलेल्या लेखी प्रश्नांना प्रशासनाला उत्तरे द्यायचीच नव्हती. त्यांनी हा भ्रष्टाचारच केला आहे. त्यामुळे ते उत्तरे देऊच शकत नाहीत. त्यांनी भ्रष्टाचार केलेलाच नाही मग सभेत उत्तरे का दिली नाहीत, असा सवाल विरोधकांनी यावेळी विचारला. त्यामुळे सत्तारूढ गटाने सभेत गोंधळ करून सभा उधळवली, असा आरोप विरोधी गटाकडून नितीन पारखे, तानाजी चव्हाण, विद्यानंद जामदार व नगरसेवक मोहन सालपे यांनी केला.

आम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. विरोधकांना या सभेत गोंधळच करायचा होता म्हणून त्यांनी सभा उधळून लावली.

- महादेवराव महाडिक

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com