राजर्षी शाहूंचा जीवनपट चित्ररूपात

लुमाकांत नलवडे
बुधवार, 25 जुलै 2018

कोल्हापूर - शिवाजी पेठेतील राजघाट रोडवर राहणारे दीपक आप्पासाहेब दळवी (वय ३८), शिक्षण बारावी. व्यवसाय सुवर्णकाम. राजर्षी शाहूंचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याची मनापासून धडपड. याच उर्मीतून त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट चित्ररूपात आणण्याचा ध्यास घेतला. या ध्यासामध्ये मित्र परिवाराने सहकार्याचे बळ भरले आणि ‘राजर्षी’ या नावाने शाहू महाराजांवरील जीवनपट चित्रमय पुस्तकरुपात प्रत्यक्षात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दळवींच्या कार्याला शाबासकीची पोचपावती देताना पाच हजार प्रतींसाठी सहकार्य केले. 

दीपक दळवी काही वर्षांपूर्वी ‘क्षत्रियकुलावतंस’ या फेसबुक पेजवरून राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील प्रसंग सोप्या भाषेत शेअर करीत होते. तीस-पस्तीस हजारांहून अधिक लोक ते वाचत होते. एवढे वाचक असूनही खरा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही, असे त्यांना वाटत होते. पाच-सहाशे पानी ग्रंथ लोक वाचतातच असे नाही. अशा वेळी छोटी; परंतु महत्त्वाच्या प्रसंगावर आधरित पुस्तिका तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या वेळी राजर्षी शाहूंच्या जीवनातील अनेक छायाचित्रे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी चित्रांच्या माध्यमातून लोकराजाचा जीवनपट मांडण्याची कल्पना मित्रांसमोर मांडली.

संदीप बोरगांवकर, विकास पाटील, नितीन देसाई, सोमनाथ माने, अनिकेत पाटील, नीलेश जाधव अशी टीमच तयार झाली. विकास हे कला शिक्षक असल्याने त्यांनी मुखपृष्ठाची जबाबदारी उचलली. पुस्तकांचे चित्रकार विजय चोकाककर यांची भेट घडवून दिली. उमेश सूर्यवंशी यांनी लिखाण केले. पुस्तकातील मजकुराप्रमाणे विषय निवडले. त्यानुसार त्या प्रसंगांना संदर्भ देऊन मांडले. चोकाककर यांनी कच्चे स्केच केले. वय, विषय, पेहराव, स्थळ, आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती अशी व्यवस्थित मांडणी करून चित्रे साकारली. मांडणी, चित्रे स्कॅन करणे, संगणकावर चित्रांची रंगसंगती तयार करणे ही जबाबदारी नागराज सोळंकी यांनी पूर्ण केली. प्रा. धीरज शिंदे, संशोधक राम यादव यांनीही निर्मीतीसाठी मदत केली. पुस्तकासाठी मित्रांकडून पैसे घेण्यात आले. रामदास पाटील, सचिन पाटील, ओंकार जमदाडे, अनिल पाटील यांनी मदत केली. त्यानंतर मात्र पदरमोड करून पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला. 

अखेर, दळवी आणि नितीन देसाई यांनी पुस्तक प्रकाशनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बोलावण्यासाठी प्रयत्न सुरू केला. ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांच्यापुढे ही धडपड मांडली. पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुस्तकाची डमी दाखविली.

चर्चेनंतर पवार यांनी पाच हजार प्रतींचे मुद्रण करा असे सांगितले. समस्या सांगण्याआधीच पवार यांनी मदतीचे आश्‍वासन देऊन ते पूर्ण केले. आता केवळ शंभर रुपयांमध्ये राजर्षी शाहूंचा जीवनपट घरोघरी जाणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.

पुस्तकाच्या अंतरंगात
कुस्ती, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्षपदासारखे प्रसंग
पृष्ठसंख्या - १२०
एकूण चित्रे - ९०

शरद पवार यांच्या हस्ते होणार प्रकाशन
२८ जुलै २०१८ शनिवारी सकाळी अकरा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात ‘राजर्षी’ या पुस्तकाचे प्रकाशन खुद्द खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. श्रीमंत शाहू महाराज अध्यक्षस्थानी असतील.

Web Title: rajashri shahu maharaj In the animated picture