राजे संघर्ष प्रतिष्ठानतर्फे हिवरे बाजार गावचा अभ्यास दौरा 

जयभिम कांबळे
रविवार, 13 मे 2018

हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन येथे त्यांना लाभणार आहे. तसेच या गावच्या भेटीतून गावचा इतिहास, ग्रामसभा व लोकसहभाग, झाडे लावा झाडे जगवा उपक्रम, पाण्याचे योग्य नियोजन, शेती रोजगार व स्वावलंबन, गावातील विविध उपक्रमांत गावकऱ्यांचा सहभाग, प्रदुषणमुक्त गाव अशा अनेक उपक्रमांची माहिती मिळणार आहे. 
 
सातारा - समाजसेवक योगेश पाटणकर यांचे वडील कै. जगन्नाथ मारुती पाटणकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तळमावले, कुंभारगाव, काळगाव विभागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना सोबत घेवून आदर्श गाव हिवरे बाजार गावचा विनामुल्य अभ्यास दौरा राजे संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आज सुरू झाला आहे. माझं गाव-आदर्श गाव-समृद्ध गाव या संकल्पनेतून या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन येथे त्यांना लाभणार आहे. तसेच या गावच्या भेटीतून गावचा इतिहास, ग्रामसभा व लोकसहभाग, झाडे लावा झाडे जगवा उपक्रम, पाण्याचे योग्य नियोजन, शेती रोजगार व स्वावलंबन, गावातील विविध उपक्रमांत गावकऱ्यांचा सहभाग, प्रदुषणमुक्त गाव अशा अनेक उपक्रमांची माहिती मिळणार आहे. 

या अभ्यास दौऱ्यासाठी तळमावले, कुभांरगाव, काळगाव विभागातील सरपंच, उपसरपंच, 
ग्रामसेवक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून या दौऱ्यासाठी समाजसेवक योगेश पाटणकर आणि राजे संघर्ष प्रतिष्ठानने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.

Web Title: raje sangharsh pratisthans tour on the hivre bazar village