राजे संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने पूरग्रस्तांना मदत 

जयभिम कांबळे सकाळ
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

- राजे संघर्ष प्रतिष्ठान तर्फे सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना धान्य, कपडे, शालोपयोगी साहित्य, ब्लँकेट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

- या साहित्याचे किट तयार करण्यात आले व प्रत्येक कुटुंबाला ते देण्यात आले.

सातारा : राजे संघर्ष प्रतिष्ठान तर्फे सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना धान्य, कपडे, शालोपयोगी साहित्य, ब्लँकेट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या साहित्याचे किट तयार करण्यात आले आणि प्रत्येक कुटुंबाला ते देण्यात आले.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कामोठे, तळमावले, कुंभारगाव, काळगाव, ढेबेवाडी, कोळे विभागातील नागरिकांनी सढळ हाताने मदत केली आहे यासाठी राजे संघर्ष प्रतिष्ठानच्या सदस्यांची अहोरात्र धडपड सुरू होती. ही गोळा झालेली मदत एकत्रित करून किट तयार करून हे किट सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी, मौलाना नगर, वसंतदादा नगर, खंडोबाची वाडी, पंचशीलनगर, साठेनगर, साखरवाडी, ब्रम्हंनाळ या पूरग्रस्त गावातील हजारो कुटुंबाना घरपोच जाऊन दिले.

समाजसेवक योगेश पाटणकर यांच्या मार्गदर्शना खाली राजे संघर्ष प्रतिष्ठान नेहमीच समजाउपयोगी उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raje Sangharsha Pratishthan helps flood survivors