मुरगूड येथे नगराध्यक्षांना शिवसेनेच्याच समर्थकांची मारहाण

प्रकाश तिराळे
बुधवार, 31 जुलै 2019

मुरगूड - शिवसेनेची निर्विवाद सत्ता असलेल्या मुरगूड नगरपालिकेच्या मंडलिक गटाअंतर्गत वाद आज उफाळून आला. स्वच्छता अभियान पुरस्कार सोहळ्यात  नगराध्यक्षांनी पक्षपात केल्याच्या कारणावरून उपनगराध्यक्ष व काही नगरसेवकांच्या समर्थकांकडून नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना मारहाण करण्यात आली. पालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर पालिका आवारातच घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली. 

नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी आपणास झालेली मारहाण ही उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके व त्यांच्या समर्थकांकडून झाल्याचा गंभीर आरोप केला आहे तर उपनगराध्यक्ष मेंडके यांनी ही मारहाण माझ्या समर्थकाकडून नव्हे तर राजेखान जमादार यांच्या कारभाराला कंटाळलेल्या मंडलिक गटाच्या समर्थकाकडून झालेला उठाव होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुरगूड नगरपालिकेच्या राजकारणात दोन वर्षांपासून गटांतर्गत वाद धुमसत आहे. तो आज चव्हाट्यावर आला. शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या मुरगूड नगरपालिकेत अंतर्गत राजकीय वादामुळे गेले पाच महिने सर्वसाधारण सभा झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर आजची सर्वसाधारण सभा वादळी होणार असल्याचे संकेत होते. स्वच्छता अभियानात पालिकेला मिळालेले बक्षीस स्वीकारण्यासाठी  उपनगराध्यक्ष तथा  स्वच्छता समितीचे सभापती नामदेव मेंडके व नगरसेवकांना का नेले नाही, यावरून काही नगरसेवकांनी सभात्याग केला. .त्यानंतर कांही वेळातच झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान मारामारीत झाले.

पालिकेची सर्वसाधारण सभा आटोपून नगराध्यक्ष जमादार घरी परतत असताना दोन महिला नगरसेवकांनी कामाच्या एका बिलाबाबत विचारणा केली. यादरम्यान शाब्दिक बाचाबाची झाली. ती  वाढत गेल्याने तिथे असणाऱ्या समर्थकांनी  नगराध्यक्ष जमादार यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. शहराच्या ऐतिहासिक हुतात्मा चौकात हा गदारोळ सुरू होता..याठिकाणी बघ्याची गर्दी जमली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajekhan Jamadar beaten up by Shiv Sena supporters