रज्जाक मास्तरांचे कलाटवादन उपेक्षितच!

- अमोल जाधव
शनिवार, 14 जानेवारी 2017

शासनाच्या कलाकार मानधनापासून वंचित; ५९ वर्षांपासून कला सादर करताहेत  
रेठरे बुद्रुक - येथील रज्जाक बाबालाल आंबेकरी यांनी कलाट वादनाच्या माध्यमातून संगीतामधील जाणकारांना पुरेपूर आनंद दिला आहेच. त्याचबरोबर सर्वसामान्य रसिकांनाही त्यांनी या वाद्याची भुरळ पाडली आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी सुरू केलेले कलाटवादन वयाची ७२ वर्षे सरली, तरी त्यांच्याकडून ऐकायला मिळते. हा कलाकार मात्र शासनाच्या मानधनापासून वंचित आहे. 

पूर्वी कृष्णा नदीवर पूल नव्हता. त्यावेळी नावेतून प्रवास असायचा. ती नाव आंबेकरी मंडळी हाकत होते. त्याच नावाड्यांच्या घरची पार्श्वभूमी असणारे रज्जाक आंबेकरी ऊर्फ रज्जाक मास्तर. दहाव्या वर्षी जलतरंग वादनात पारंगत झाल्याने त्यांनी चौदाव्या वर्षी कलाट वादनाची कला आत्मसात केली. मिरज येथील बालेखान घराण्यामधील आसदखान यांच्याकडून ते ही कला शिकले. आज तब्बल ५९ वर्षे अव्यातहपणे ते कलाटवादन सादर करत आहेत. 

संगीतकार राम कदम व बंडोपंत तसेच उषा चव्हाण यांच्या सहवासासह राज्यातील नामवंत लोकनाट्य तमाशांच्या पार्ट्यांबरोबर त्यांनी कला सादर केली आहे. ‘दे रे काना’, ‘कुहू... कुहू बोले कोयलया’, ‘नाच रे मोरा’, ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ यासह सुमारे १०० गीतांचा त्यांचा हुबेहूब सराव आहे. ‘ए मालिक तेरे बंदे हम’ या गाण्यावर (कै.) जयवंतराव भोसले यांच्याकडून मिळालेली फर्माईश ही अविस्मरणीय आठवण असल्याचे ते सांगतात. शासनाचे कलाकार मानधनही त्यांना मिळत नाही. उदरनिर्वाहाचा यक्षप्रश्न असला तरी रज्जाक मास्तरांनी आपली कलाट वादनाची जादू चालवणे सुरूच ठेवले आहे.

पूर्वीची वाद्ये कमी झालीत. आज डीजेचा जमाना असल्यामुळे कलाटवादनावेळी पूर्वीइतका जोश व मजा येत नाही. शासनाने या दुर्मिळ कलाटवादनास राजमान्यता द्यावी.
- रज्जाक आंबेकरी, कलाटवादक 

Web Title: rajjak master kalatvadan