हवेत गोळीबार करणारे अन् चॉकलेट देणारे सरकार - राजू प्याटी 

तात्या लांडगे
बुधवार, 9 मे 2018

सोलापूर - भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. तरीही अच्छे दिन, स्मार्ट सिटी, सबका साथ सबका विकास अशाप्रकारच्या घोषणा आपल्याला ऐकायला मिळतात. असे सांगताना हवेत गोळीबार करणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजू प्याटी यांनी बनावट बंदूकितून हवेत गोळीबार केला. तसेच चॉकलेट, बिस्कीट वाटप करत अनोखे आंदोलन केले.

सोलापूरचा समावेश स्मार्ट सिटीत होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला तरीही नागरिक शहरातील शासकीय रुग्णालये, कार्यालये, मैदानांवर उघडयावर शौचास बिनधास्त बसतात. त्यांच्यासाठी महापालिकेने पाण्यासह अन्य व्यवस्था पुरेशी दिलेली नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हागणदारीमुक्त देश, स्वछ भारतचा नारा देत आहेत. त्याचाही प्याटी यांनी कमोडवर बसून निषेध व्यक्त केला.

मतदार हा राजा आहे, त्यांनी कोणालाही मतदान करावे. परंतु, जनतेचा, देशाचा विकास करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून दयावे. नाहीतर सरळ 'नोटा'ला मतदान करावे, असे आवाहन प्याटी यांनी केले.

Web Title: raju pyati attack on bjp government