...मग सरकारला उद्धव ठाकरेंनी जाब का विचारला नाही - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

सांगली - एकीकडे सत्तेचे लाभ घ्यायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांविषयी कळवळा व्यक्त करायचा. ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आता सर्वांना कळाली आहे. आता कोणीही फसणार नाही. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांचा कळवळा आहे तर मग तुम्ही सरकारला जाब का विचारला नाही याचे उत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्यावे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

ठाकरे यांनी पीक विम्याच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या त्यांच्या भुमिकेवर श्री. शेट्टी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारची तिजोरी लुटली आहे. ही वस्तूस्थिती नव्यानेच ठाकरे यांना कळाली आहे असा भाग नाही. गेल्या दोन चार वर्षांपासून पीक विमा कंपन्यांकडून हे होत आहे.  पण या प्रकारावर उद्धव ठाकरे यांना आत्ता अचानक जाग आली आहे. असे श्री शेट्टी म्हणाले. उद्धव ठाकरे आता या प्रश्नी मोर्चा काढण्याची भाषा करत आहेत. यांची ही नाटक संपूर्ण महाराष्ट्राला समजली आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetti comment on Shivsena party president Uddhav Thackery