सांगली : ‘‘दक्षिण भारत जैन सभेच्या (South India Jain Sabha) अध्यक्षनिवडीची प्रक्रिया व नंतर झालेली हाणामारी समाजासाठी लाजिरवाणी होती. हा प्रकार टाळावा, सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेत एकमताने अध्यक्ष निवड व्हावी, यासाठी मध्यस्थी केली. समाजाने दोन्ही गटांचे कान धरून जाब विचारला पाहिजे, अशा प्रवृत्तींना खड्यासारखे वेचून बाजूला केले पाहिजे,’’ अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून मांडली.