Loksabha2019: पाच वर्षांत शेट्टींची संपत्ती तिप्पट

Loksabha2019: पाच वर्षांत शेट्टींची संपत्ती तिप्पट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ झाली आहे. शेट्टी यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. मुंबईतील ‘म्हाडा’चा फ्लॅट विकल्याने संपत्तीत वाढ झाल्याचे शेट्टी यांनी या विवरणपत्रात म्हटले आहे.

२०१४ साली शेट्टी यांच्याकडे सर्व मिळून ८३ लाख ८७ हजारांची संपत्ती होती, आता ही संपत्ती २ कोटी ३६ लाख झाली आहे. 
पाच वर्षांत या संपत्तीत तब्बल १ कोटी ५२ लाखांची भर पडली आहे. नव्या घराच्या बांधकामासाठी २२ लाख रुपये हे लोकवर्गणीतून जमा झाल्याचे या विवरणपत्रात म्हटले आहे.

संपत्ती वाढीची तीन कारणे शेट्टी यांनी विवरण पत्रात दिली आहेत. त्यात मुंबईतील ‘म्हाडा’चा २०१४ साली ४५ लाखाला घेतलेला फ्लॅट १ कोटी ४३ लाखाला विकला. गेल्या पाच वर्षांत कोणतीही जमीन खरेदी नाही. परंतु, सरकारी मूल्यांकन २०१४ पेक्षा जास्त झाल्याने संपत्तीत १० लाख ४७ हजारांची वाढ, खासदार म्हणून मिळणाऱ्या शासकीय पगार व भत्त्यात वाढ या कारणांचा समावेश आहे. 

पत्नी व मुलाच्या नावांवरील संपत्ती 
शेट्टी यांच्या पत्नी संगीता यांच्या खात्यावर ३२४२ रुपये, तर मुलगा सुजय याच्या नावावर १३ हजार ५०० रुपये बॅंकेत आहेत. मुलाच्या नावावर दोन हजारांचे शेअर्स, सौ. शेट्टी यांचा ७९ हजारांचा, तर मुलगा सुजय यांचा २ लाख ८० हजारांचा विमा आहे. सौ. शेट्टी यांच्याकडे ३ लाख ९४ हजाराचे, तर मुलाकडे ३२ हजार ८७० रुपयांचे दागिने आहेत. मुलाच्या नावावर ९० हजारांचे एक वाहन आहे.

मालमत्ता तपशील (आकडे रुपयांत)
तपशील     २०१४    २०१९                   
रोकड    १७,०००    २७,०००  
बॅंक शिल्लक      १ कोटी ३ हजार २०८    १३ लाख ९१ हजार ११३
शेअर्स रक्कम    १ लाख २० हजार ३५०    २ लाख ३१ हजार २५०
विमा रक्कम    ७ लाख ४० हजार ६६४    १४ लाख ६४ हजार ६२९
वाहन    १४ लाख ८० हजार    १५ लाख ४७ हजार 
सोने जिन्नस    ३ लाख ३० हजार    ३ लाख ९४ हजार ४४० 
शेत जमीन    १७ लाख    २७ लाख ७० हजार २५०
म्हाडा फ्लॅट    ४५ लाख     फ्लॅट विकला
गुंतवणूक स्वाभिमानी दूध     ----    २५ लाख ९० हजार 
गुंतवणूक एमआयडीसी     ----    ५३ लाख ६९ हजार 
इतर गुंतवणूक    ----    ५ लाख ३० हजार 
घर बांधकाम     ----     ७४ लाख ६३ हजार ८००
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com