ऊसदरासाठी राजू शेट्टी आक्रमक ; चक्का जामची घोषणा

Raju Shetty is aggressive for Sugarcane Rate
Raju Shetty is aggressive for Sugarcane Rate

सांगली : "अर्जुनाला केवळ माशाचा डोळा दिसला, तसे मला ऊसदराशिवाय काही दिसत नाही. मी गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांचा संयम संपण्याआधी सरकारने योग्य निर्णय करावा; अन्यथा 2013 चा उद्रेक होईल. वेळप्रसंगी कायदा हाती घेतल्यास सरकार जबाबदार असेल. रविवारी (ता. 11) ऊसपट्ट्यात सर्व व्यवहार बंद, चक्का जाम करणार आहे. शेतकऱ्यांना ऊसदर मिळू नये, यासाठी सर्वपक्षीय कारखानदार एकत्र आलेत; परंतु ऊसदरासाठी कोणालाही अंगावर घेण्याची तयारी आहे,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

ते म्हणाले, "ऊस परिषदेतील दहा प्रमुख ठरावांतील दोन ठराव महत्त्वाचे होते. एफआरपी अधिक 200 रुपये असा पहिला ठराव आणि दुसरा ठराव उचल संदर्भात होता. केंद्राने जाहीर केलेली एफआरपी आधी द्यावी. ज्यांनी एफआरपी दिली नाही, त्यांचा गाळप परवाना रद्द करावा, अशा सूचना आहेत. मात्र, पोलिस संरक्षणात कारखाने सुरू आहेत. बंदोबस्तात दरोडे टाकण्याचा उद्योग सुरू आहे. दरासाठी कोल्हापूरसह सर्वत्र कारखाने बंद आहेत. सांगलीच्या काहींनी सुरू ठेवलेत. त्यांना ताकद दाखवून देऊ.'' 

ते म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या एका ऊस परिषदेत जी भूमिका घेतली, त्याचे समर्थन केले. पण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच त्याला छेद दिला; मग सरकारने आपली भूमिका काय हे स्पष्ट करावे. कारखाने असेच सुरू राहिले तर मागण्या मान्य झाल्या असे समजायचे का? सरकारला एफआरपीचे तीन तुकडे करायचेत. सरकारमधल्या काही नेत्यांना चळवळ मोडीत काढायची आहे. गेल्या वर्षी चंद्रकांत पाटील यांनी केवळ श्रेयासाठी मध्यस्थी केली. यंदा त्यांच्याशी चर्चाच करणार नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी, एफआरपी दिली नाही तर न्याय मागायचा कोणाकडे, हे स्पष्ट करावे.'' 

दरासाठी तडजोड नाही... 

ऊस कारखानदारांशी जुळते घेतले आहे, या प्रश्‍नावर शेट्टी म्हणाले, ""शेतकऱ्यांना बुडवण्यासाठी सर्वपक्षीय कारखानदार एकत्र आलेत. राजकारणावेळी राजकारण पाहू. सध्या तरी दरासाठी कसलीच तडजोड करणार नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com