कमी दराने साखर विकणाऱ्या कारखान्यांची चौकशी करा - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

जयसिंगपूर - केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव २९०० रुपये केलेला असून जे साखर कारखाने यापेक्षा कमी दराने साखर विकतील, त्या  साखर कारखान्यांची चौकशी करून कारवाई करा, असा आदेश केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी दिल्लीत दिला. 

खासदार राजू शेट्टी यांनी आज पासवान यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील साखर कारखाने केंद्राने ठरवून दिलेल्या भावापेक्षा कमी दराने साखर विकत असल्याची तक्रार केली. त्यावेळी श्री. पासवान यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

राज्यात काही साखर कारखाने २९०० रुपयापेक्षा कमी दराने साखर विकत आहे. सरकारने कायदा केला असला तरीही कमी दर्जाचे साखर दाखवून सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे साखरेच्या होलसेल दरामध्ये घट होत आहे. २९०० रुपये हा भाव गेल्या वर्षीची एफआरपी डोळ्यासमोर धरून केला आहे. यंदा वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता या वर्षी साखरेच्या विक्रीचा दर किमान ३४०० रुपये प्रतिक्विंटल करण्याची आवश्‍यकता आहे. थकलेली एफआरपी लक्षात घेता सरकारने साखरेचे भाव तातडीने ३४०० रुपयांपर्यंत स्थिर करावेत, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी या वेळी केली.

Web Title: Raju Shetty comment