...तर शहांना कोल्‍हापुरात फिरू देणार नाही : शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

कोल्हापूर - साखर कारखानदारांकडून कमी दरात वीज खरेदी करतात, तीच वीज शेतकऱ्यांना महाग दरात विकतात. त्याचा हिशेब करण्याचे मात्र ते नाकारतात, शेतकऱ्याला एफआरपी देत नाहीत. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य न केल्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कोल्हापुरात फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

कोल्हापूर - साखर कारखानदारांकडून कमी दरात वीज खरेदी करतात, तीच वीज शेतकऱ्यांना महाग दरात विकतात. त्याचा हिशेब करण्याचे मात्र ते नाकारतात, शेतकऱ्याला एफआरपी देत नाहीत. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य न केल्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कोल्हापुरात फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

इरिगेशन फेडरेशनतर्फे कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डात शेतकरी मेळावा झाला. या वेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या 
वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करावी, तसेच वाढीव वीज दरवाढ रद्द करण्यासाठी २१ जानेवारीला शिरोली पुलाजवळ महामार्ग रोको करण्यात येणार आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने सहभागी होईल, असे सांगून खासदार शेट्टी म्हणाले की, ‘‘आंदोलनात शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, तरच सरकार आपली दखल घेईल. अन्यथा, यांच्या आंदोलनात दम नव्हता, असे सरकार म्हणू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांचे गांभीर्य सरकारला समजण्यासाठी आंदोलन तीव्रच करावे लागेल.’’ 

शेतकऱ्यांच्या डोईवर वीज वितरण कंपनीने वीज दरवाढ लादली आहे, असा आरोप करीत श्री. शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘‘वीज दरात वारंवार वाढ करून तांत्रिक घोळ करून शेतकऱ्यांची लूट केली आहे. त्यासाठी सत्यशोधन समिती नियुक्त केली होती. त्या समितीच्या शिफारशी वीज कंपनी मान्य करीत नाही. याउलट साखर कारखान्यांकडून कमी दराने वीज घेऊन तीच महाग दरात विकली जाते. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे, खतावर जीएसटी लावला आहे. उत्पादनात घट होत आहे, शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्या जोडीला वीज दरवाढीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय गत्यंतर नाही.’’  

सातत्याने वीज चोरी होत आहे. त्याकडे वीज कंपनी दुर्लक्ष करते. वीज चोऱ्या करणाऱ्यांना विधानसभेत बसवले जाते. जो शेतकरी वीज कंपनीच्या चुकीच्या बिलांवर विश्‍वास ठेवून बिले भरतात त्यांचीच अडवून केली जाते. या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलने केली. मात्र, सरकारला आता निवेदन, मोर्चा, विनंती, गोड बोलणे कळत नाही. म्हणूनच हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवावी.
- राजू शेट्टी,
खासदार

Web Title: Raju Shetty comment

टॅग्स