सदाभाऊंची गोफण "स्वाभिमानी'च्या विरोधकांसाठी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाला पाठिंबा देणार हे कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ठरवणार असल्याचे आज खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काढलेली गोफण ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पिकावर बसणाऱ्या पाखरांसाठी असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

खंडपीठाच्या सर्वपक्षीय बैठकीसाठी आज दुपारी खासदार सर्किट हाऊसवर आले होते. बैठक सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 

गतवेळेपेक्षा या वेळी जिल्हा परिषदेत "स्वाभिमानी'ला कमी यश मिळाले या प्रश्‍नावर खासदार शेट्टी म्हणाले, ""कमी म्हणता येणार नाही. कारण दोन जिल्हा परिषद सदस्य आणि चार पंचायत समितीवर आमचे उमेदवार निवडून आले आहेत. कोल्हापूरबरोबरच अमरावती, सांगली, वाळवा येथेही स्वाभिमानीचे उमेदवार विजयी झाले आहेत. आमची ताकद कमी झालेली नाही.'' जिल्हा परिषदेत गतवेळी तुम्ही सत्तेत होता. एक सभापतिपद तुम्हाला मिळाले होते. या वेळी तुमचा कोणाला पाठिंबा असणार यावर खासदार शेट्टी म्हणाले, ""जिल्हा परिषदेमध्ये या वेळी प्रत्येकाने सोयीची भूमिका घेतली आहे. मतदारांनी अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धडा शिकवला आहे. त्यामुळे कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत कार्यकर्ते, विजयी उमेदवार यांची बैठक घेतली जाईल. त्या बैठकीनंतर पाठिंब्याचा निर्णय घेतला जाईल.'' 

मंत्री खोत यांनी गोफण तयार ठेवली आहे. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय, यावर खासदार शेट्टी म्हणाले, ""सदाभाऊंची गोफण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पिकावर बसलेल्या पाखरांची हकालपट्टी करण्यासाठी आहे. सदाभाऊ पट्टीचे शेतकरी आहेत. गोफण कोणावर फिरवायची हे त्यांना चांगलंच कळतं.'' 

Web Title: raju shetty press conference