राजवर्धन राठोड यांची #HumFitTohIndiaFit माेहिम

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 23 मे 2018

केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेते ऋतिक रोशन, बॅडमिंटनपटू साईना नेहवाल यांना टॅग करुन या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

सातारा - केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी त्यांच्या कार्यालयात जोर मारत असल्याचा व्हिडिओ आज ट्विवट करुन देशातील नागरीकांना #HumFitTohIndiaFit असे सांगून तुम्ही ही तुमच्या फिटनेसचे रहस्य छायाचित्र अथवा व्हिडिओद्वारे अपलोड करावे असे आवाहन केले आहे. 

विशेष म्हणजे राठोड यांनी फॉर्मल कपडे परिधान करुन कार्यालयातच नागरीकांशी संवाद साधत 10 जोर मारत संदेश दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र कामकाजात व्यस्त असतात. नित्यनेमाने करीत असलेला व्यायाम व त्यांचे योग प्रेम हे प्रेरणादायी असल्याचे राठोड नमूद करतात. राठोड यांनी क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेते ऋतिक रोशन, बॅडमिंटनपटू साईना नेहवाल यांना टॅग करुन या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. अाज (मंगळवार) सकाळी 11 च्या सुमारास राठाेड यांनी व्हिडिअाे अपलाेड केल्यानंतर ट्विटरवर नामवंत खेळाडूंसह सेलिब्रेटी व नागरीकांनी त्यांचा फिटनेसमंत्रा अपलाेड करण्यास प्रारंभ केला अाहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Rajvardhan Rathores Hum Fit Toh India Fit Campaign