'राज्य मतदार दिवस' एक जुलैला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

सोलापूर - मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या धर्तीवर यापुढे एक जुलै हा दिवस राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या दिवशी विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत.

भारतातील लोकशाही बळकट करण्याच्या हेतूने मतदारांना जागृत करून त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा या हेतूने सिस्टॅमेटिक व्होटर्स एज्युकेशन ऍन्ड इलेक्‍ट्रोल पार्टिसिपेशन- स्विप हा महत्त्वाकांक्षी उपक्रम निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येतो. त्यानुसार दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो.

या दिवशी देशभरात मतदार जनजागृतीसाठी उपक्रम राबविले जातात. स्विप कार्यक्रमाची अंमलबजावणी फक्त राष्ट्रीय मतदार दिनापुरता मर्यादित राहू नये. मतदार जागृतीचे काम कायम सुरु रहावे यासाठी दर वर्षी राज्यस्तरावर राज्य मतदार दिवस आणि जिल्हा स्तरावर जिल्हा मतदार दिवस साजरा करण्यात यावा, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत.

Web Title: rajya matdar divas 1st july