#Rakshabandan : पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये पत्रकारांसोबत रक्षाबंधन

#Rakshabandan with journalists at Poddar International School
#Rakshabandan with journalists at Poddar International School

कोपर्डे हवेली : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता समारंभ, सन्मान, कौतुक सोहळा यामध्ये नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. सामाजिक, शासकीय, राजकीय, नागरी सुविधा, भ्रष्टाचार अशा अनेक बाबी उजेडात आणणारे पत्रकार मात्र अंधारात राहतात. हीच उणीव भरून काढण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थीनींनी पत्रकारांना राखी बांधून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. तसेच त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शाळेचे उपप्राचार्य गणेश काकडे म्हणाले, पत्रकार आपल्या टोकदार लेखणीतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असतात. समाज उन्नती आणि समाज प्रबोधनामध्ये पत्रकारितेचा सिंहांचा वाटा आहे. 

यावेळी अरोही कदम व विजयंता पाटील या दोन विद्यार्थीनींनी रक्षाबंधनाचे व पत्रकारितेची माहिती विशाद केली. सारिका चव्हाण व नम्रता माढेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मधुमती मुळीक यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य अविनाश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य गणेश काकडे, प्रशासकीय अधिकारी विशाल जाधव, प्रकल्प प्रमुख सारिका चव्हाण, नम्रता माढेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. 
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

समाजातील विविध घटकांकडून आपण खूप गोष्टी घेत असतो त्यामुळे समाजाचे आपण काही तरी देणं लागतो या भावनेतून आमच्या शाळेने Giving Back हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आम्ही परिसर स्वच्छता, केरळमधील पुरग्रस्थांना मदत केली आहे. आजचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील त्याचाच एक भाग आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होत आहे. 

विशाल जाधव. 
प्रशासकीय अधिकारी, पोदार इंटरनॅशनल स्कुल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com