छोटेसे बहीण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - ‘छोटेसे बहीण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ... उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, नवीन आकार देऊ...’ असे गीत गात आज येथील ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळेत रक्षाबंधनाचा सण सळसळत्या उत्साहात झाला. रविवारी (ता. २६) सुटी असल्याने शनिवारपासूनच अंधशाळेत विविध सेवाभावी संस्थांनी हजेरी लावली. बहीण व भाऊ या नात्यांतील वीण अधिक घट्ट करणारी गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. 

नागाव (ता. करवीर) येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी गेली पाच वर्षे अंधशाळेत येतात आणि शाळेतील मुलांना राख्या बांधतात. दरम्यान, डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, तपोवन बालमंदिर, दाजी देसाई विद्यालय, गोखले महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय आदी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही अंधशाळेतील विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या. अंधशाळेतील मुलं अंध असली तरी ती सामान्य मुलांपेक्षाही अधिक सजग आहेत. 

त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधताना त्यांना आपल्यापेक्षाही अधिक विषयांची माहिती आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातील आत्मविश्‍वास आम्हाला प्रेरणा देत असतो, अशा प्रतिक्रिया या वेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

सामान्य मुलींना अंध मुलांचं जगणं अधिक जवळून अनुभवता यावं, त्यातून त्यांच्याविषयीच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात, या उद्देशाने प्रत्येक वर्षी आम्ही किमान ४० ते ५० विद्यार्थिनींना घेऊन अंधशाळेत येतो.
- अरविंद मगदूम, शिक्षक, माध्यमिक विद्यालय, नागाव

Web Title: Rakshabandhan