‘अमेरिकन डायमंड’ अन्‌ ‘लाईट स्पिनर’

नंदिनी नरेवाडी
रविवार, 12 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - भावा-बहिणींचं नातं अतूट करणारा रक्षाबंधन सोहळा तोंडावर आला आहे. या सणाला हौसेचं कोंदण जरूर लाभतं, तसं यंदाही आहे. वैविध्यपूर्ण राख्या बहिणी भावाला बांधणार आहेत. यातही नावीन्यपूर्ण अशी चक्क आठशे रुपयांची राखीही खरेदी केली जात आहे.

कोल्हापूर - भावा-बहिणींचं नातं अतूट करणारा रक्षाबंधन सोहळा तोंडावर आला आहे. या सणाला हौसेचं कोंदण जरूर लाभतं, तसं यंदाही आहे. वैविध्यपूर्ण राख्या बहिणी भावाला बांधणार आहेत. यातही नावीन्यपूर्ण अशी चक्क आठशे रुपयांची राखीही खरेदी केली जात आहे. यात अमेरिकन डायमंड असलेली राखी घेण्यासाठी बहिणी भावांसाठी हौस करणार आहेत. अशी नावीन्यपूर्ण राखी भावाच्या आनंदात प्रसन्नतेचा, मायेचा धागा गुंफणार आहे. 

राखी पौर्णिमाला अद्याप १५ दिवस बाकी असले, तरी बाजारात राख्यांचे स्टॉल सजू लागले आहेत. राखी पौर्णिमेच्या तयारीला वेग आला आहे. विविध प्रकारांतील व आकारांतील रंगीबेरंगी राख्यांनी बाजारपेठ सजली आहे. बंधुरायाच्या हातात आकर्षक, सुंदर आणि ‘हट के’ राखी बांधण्यासाठी राखीच्या खरेदीसाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. शहरात महाद्वार मार्ग, बाजारगेट, राजारामपुरी परिसरात राख्यांचे स्टॉल उभारले आहेत.  

शहरात ‘राखी’खरेदी-विक्रीत दरवर्षी कोटींची उलाढाल होते. यंदा बाजारात आलेल्या राख्यांत लहान मुलांना आवडणाऱ्या राख्यांचा समावेश आहे. यात छोटा भीम, डोरेमॉन, मोटू, पतलू या कार्टूनच्या राख्यांनी चिमुकल्यांना भुरळ पाडली आहे. विशेष म्हणजे यंदा नवीनच आलेली ‘स्पिनर’ची राखी पसंतीस उतरत आहे. यातही ‘म्युझिकल लाईट स्पिनर’ राखी आकर्षण ठरत आहे. या राखीची किंमत १५० पासून ५०० रुपयांपर्यंत आहे.  तसेच ‘लुंबा’ राख्यांनाही विशेष मागणी आहे.

जीएसटीमुळे ५ टक्के दरवाढ
गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘राखी’ जीएसटीमुक्त झाली असली, तरी राखीचा धागा व मजुरीवरील जीएसटीमुळे यंदा राख्यांचे दर पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढणार आहेत. 

यंदाही राख्यांना खूप मागणी आहे. शिवाय राख्यांच्या धाग्याला ‘जीएसटी’ लागल्याने राख्यांचे दर पाच टक्‍क्‍यांनी वाढणार आहेत.
-विजय शहा,
विक्रेते, महावीर राखी सेंटर.

Web Title: Rakshabandhan special story