स्वस्त धान्य दुकानदारांचा पीओएस मशीनला विरोध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

सांगली - सांगली शहर व ग्रामीण सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने आज विविध मागण्यासाठी मोर्चा काढला. शालेय पोषण आहाराचे थकीत कमिशन त्वरित द्या, द्वार घरपोच योजना पुन्हा सुरू करा, गोवा किंवा अन्य राज्याप्रमाणे धान्य वितरण कमिशनमध्ये वाढ करा, या मागण्याचे निवेदन देण्यात आले. 

नव्याने स्वस्त धान्य दुकानदारांसाठी आणलेली प्रस्तावित पीओएस मशीनद्वारे वितरणाच्या जाचक नियमाची अंमलबजावणी करू नये. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण रद्द करून मशीन परत पाठवा.'' 

दुकानदार आपटा पोलिस चौकीजवळ जमा झाले. तेथून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने आले. अध्यक्ष मुन्ना कुरणे यांच्यासह बिपीन कदम, दत्तात्रय माळी, कराडचे संजय शेटे, पोपट सलगर, सुनील आलदर, उल्हास चव्हाण, इलाही बारूदवाले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. शहर व ग्रामीण विभागातील स्वस्त धान्य दुकानदार मोर्चात सहभागी झाले. 

श्री. कुरणे म्हणाले, ""भाडे, वीजबिल, नोकर पगार असा खर्चही निघत नाही. अशी अवस्था असताना रोज नवा आदेश काढून दुकानदारांना हैराण केले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकाम चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत आहे.'' 

ते म्हणाले, ""आम्हा स्वस्त धान्य दुकानदारांना मानधन किंवा वेतन अशा स्वरूपात स्थिर उत्पन्नाची हमी द्या. ती अन्न नागरी पुरवठा विभागाकडून हवी, अन्य बॅंक, वित्तीय सेवा, बियाणे विक्री, कर्लेव बुकिंग या माध्यमातून नको.'' 

15 मार्चपासून उपोषण 
दरम्यान, येत्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास पंधरा मार्चपासून बेमुदत उपोषण आंदोलन केले जाईल, असा इशारा मुन्ना कुरणे यांनी दिला आहे.

Web Title: Rally on collector office