उमर खालिदवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मोहोळमध्ये रॅली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्यावर दिल्ली येथे ता. 13 ऑगस्टला गोळीबार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून निषेध रॅली काढण्यात आली. 

मोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आता तशा आशयाचे निवेदन तहसीलदार किशोर बडवे यांना दिले. 

जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्यावर दिल्ली येथे ता. 13 ऑगस्टला गोळीबार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून निषेध रॅली काढण्यात आली. 

रॅलीची सुरवात गवत्या मारूती चौकातून करण्यात आली. रॅली आंबेडकर चौक बुधवार पेठ शिवाजी चौक या मार्गावरून तहसील कार्यालय आवारात आली. यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा मोहोळ चे नगराध्यक्ष रमेश बारसकर म्हणाले, अशा घटना थांबल्या पाहिजेत. यामुळे जातीय तणाव वाढून समाजात अशांतता निर्माण होणार आहे. हल्ला करणाऱ्यांना शोधुन काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अतुल क्षीरसागर, शिलवंत क्षीरसागर, सागर अष्टुळ, सोमनाथ भालेराव, जितेंद्र अष्टुळ, प्रकाश सोनवणे, संदीप सोनवणे, रवी थोरात, श्रीकांत गाढवे, सिध्देश्वर गाढवे, सुलतान पटेल, शुभम उंबरे उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Rally in mohol against attack on umar khalid